शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

केंद्र, राज्यातील मतलबी सरकारकडून जनतेची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 00:03 IST

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कºहाड येथे माजी ...

कºहाड : ‘देशात आणि राज्यातील सरकार मतलबी आहे. निरनिराळी आमिषे दाखवून त्यांनी लोकांना फसवलं आहे. तीन वर्षांनंतर आपण फसलोय, हे लोकांच्याही लक्षात येऊ लागलंय. त्यामुळे हे मतलबी सरकार लवकरच संपेल आणि ज्वालामुखीसारखा उद्रेक होऊन काँग्रेस पुन्हा सत्तेवर येईल,’ असा विश्वास माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केला.कºहाड येथे माजी सहकारमंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचा राजकीय, सामाजिक वाटचालीचा सुवर्णमहोत्सव व १९४२ च्या भारत छोडो आंदोलनाचा अमृतमहोत्सव असा संयुक्त कार्यक्रम पार पडला; त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर होते. माजी मंत्री जयवंतराव आवळे, माजी आमदार उल्हास पवार, डॉ. भारत पाटणकर, ज्येष्ठ शेती शास्त्रज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ पत्रकार ज्ञानेश महाराव, विनोद शिरसाठ, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ‘देश कुठे चाललाय, हे कळत नाही. देशात हुकूमशाही वाढू लागल्याचे चित्र दिसतंय. मी गृहमंत्री असतानाही अनेक गोष्टी केल्या; पण त्याचा कधी गाजावाजा केला नाही. खरंतर गृहमंत्री म्हणून काम करीत असताना अनेक गोष्टी या गोपनीय ठेवाव्या लागतात. आमच्या काळातही मिलीटरी स्ट्राईक झाले होते, पण यांनी त्याला ‘सर्जिकल स्ट्राईक’ असे गोंडस नाव देऊन आम्ही काही तरी वेगळं केलं आहे, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे.काँग्रेसचा एकदा नव्हे दोनदा नव्हे, तर तब्बल तीनवेळा पराभव झाला आणि आता काँग्रेस संपली अशा वल्गना सुरू झाल्या. मात्र, काँग्रेस कधी संपली नाही आणि संपणार नाही. काँग्रेसने पुन्हा उभारी घेतली. देशातील आणि राज्यातील सद्य:स्थिती पाहता जनतेमध्ये प्रचंड राग पसरला असून, काँगे्रस पुन्हा एकदा उंच भरारी घेईल.’ईव्हीएम घोटाळ्यावर टीकाआम्ही दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर प्रेम करणारी माणसे आहोत. पराभूत झालो म्हणून हटणारे नाही. ज्या इंदिरा गांधींचा लोकांनी पराभव केला त्यांनाच लोकांनी प्रचंड मतांनी निवडून दिल्याचा इतिहास आहे. अन् तेही बटण दाबून नव्हे, असं म्हणत शिंदे यांनी ईव्हीएम मशीन घोटाळ्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर